लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये शहराची अर्थव्यवस्था कोलमडली असून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे़ कामगार आणि त्यांच्या कुटूंबाची देखील वाताहत होत आहे़ स्थानिक प्रशासनाने लॉकडाउन शिथील करुन शहरातील उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पारोळा रोड व्यापारी संघटनेनेन केली आहे़व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, पारोळा रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल माने यांच्यासह रवींद्र ताथेड, प्रविण रेलन, सुनील पंजाबी, दिनेश रेलन, राजेंद्र तनेजा, अनिल कटारीया, नगरसेवक हर्षकुमार रेलन, गुलशन उदासी आदी व्यापाºयांनी बुधवारी महापौर चंद्रकांत सोनार, मनपा आयुक्त अजीज शेख, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांची भेट घेवून चर्चा केली तसेच निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यापर्यंत बाजारपेठेतील व्यापाºयांनी लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली़ कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे यात शंका नाही़ धुळे शहरात बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु त्या तुलनेत बरे होणाºयांचे प्रमाणही अधिक आहे़ कोरोनाच्या या लढ्यात सर्वच स्तरातील अनेकजण सज्ज आहेत़ प्रत्येक जण कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी खबरदारी घेत आहे़ परंतु कोरोनाच्या या संसर्गात व्यापाºयांची बाजारपेठ बंद पडल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे़ कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आर्थिक कणा मजबूत असणे आवश्यक आहे़व्यापारी आणि व्यापाºयांवर अवलंबून असणारे अनेक कामगारांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत़ खाजगी नोकरी करणाºयांची कुटूंबे बेहाल जीवन जगत आहेत़ त्यामुळे प्रशासनाने आपल्या अधिकारांचा वापर करुन काही प्रमाणात शिथीलता दिली तर हे व्यापारचक्र पुन्हा फिरु शकते़ यासाठी कोवीडसाठीची यंत्रणा, संचारबंदी, आरोग्य विभाग, नागरी सोयी सुविधा, वैयक्तिक खबरदारी यांचा सुवर्णमध्य साधता येणे शक्य आहे़फिजीकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर, कमी वेळेत पूर्तता, शासन, प्रशासनाला सहकार्य आदी उपायोजना कटाक्षाने पाळण्यास व्यापारी तयार असल्याची ग्वाही देण्यात आली़दुसºयांदा घेतली भेट४चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन वाढविले त्यावेळी देखील व्यापाºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून दुकाने सुरु करण्याची परवानगी मागितली होती़ परंतु जिल्हाधिकाºयांनी याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करण्याचे सांगितले होते़ व्यापाºयांनी आयुक्तांची भेट घेतली़ परंतु परवानगी मिळाली नाही़ आता पुन्हा व्यापाºयांनी आयुक्तांची भेट घेतली़
दुकाने सुरु करण्याची परवानगी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:42 IST