सलून दुकानांना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:39 IST2020-06-20T20:38:51+5:302020-06-20T20:39:09+5:30
धुळे : इतर उद्योग, व्यवसायांप्रमाणेच सलून दुकानांना देखील परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय जिवा सेनेने केली आहे़ जिवा ...

dhule
धुळे : इतर उद्योग, व्यवसायांप्रमाणेच सलून दुकानांना देखील परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय जिवा सेनेने केली आहे़
जिवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच नाभिक सेवा आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ शासकीय नियम व अटीनुसार नाभिक दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, सलून दुकानदार आणि कारागिरांची कामगार योजने अंतर्गत नोंदणी करुन त्यांनी लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे दरमहा दहा हजार रुपये आर्थिक मदत द्यावी यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ निवेदनावर प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, प्रदेश उपाध्यक्ष भगवान चित्ते, उत्तर महाराष्ट्र कार्याध्य, सुधीर महाले, संपर्क प्रमुख सुधीर सोनगरे, जिल्हाध्यक्ष गणेश ठाकरे, शहराध्यक्ष राहूल सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज ठाकरे, कोषाध्यद्व ज्ञानेश्वर सोनवणे, कार्याध्यक्ष वसंत चित्ते, मनोज गोरगांवकर, शहर संघटक मनोज पगारे, संपर्क प्रमुख शंकर सैंदाणे, जिल्हाध्यक्ष भिमराव वारुळे, जितेंद्र बोरसे, जिल्हाध्यक्ष रमेश पगारे आदींच्या सह्या आहेत़