सलून, ब्युटी पार्लरला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 22:41 IST2020-05-31T22:40:41+5:302020-05-31T22:41:15+5:30
संदीप बेडसे : जिल्हा प्रशासनाला सूचविले प्रतिबंधात्मक उपाय

सलून, ब्युटी पार्लरला परवानगी द्या
धुळे : लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्याची विनंतीही त्यांनी प्रशासनाला केली आहे़
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह काही अटी आणि शर्ती लागु करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत़ सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने सरु ठेवता येतील, ग्राहकांना नंबर देण्यासाठी दुकानाच्या बाहेर नोंदवही ठेवण्यात येईल, ग्राहकाने रजिस्टरमध्ये नाव, पत्ता इत्यादी माहिती भरल्यानंतर त्यांना नंबर देऊन दुकानात येण्याची वेळ सांगण्यात येईल, एका वेळी केवळ एकाच ग्राहकाला दुकानात प्रवेश मिळेल व दुकानात ग्राहक आणि कारागीर असे दोघेच असतील याची काळजी घेतली जाईल. सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्च्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवून एकापेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात प्रवेश देता येवू शकतो, कारागीर आणि ग्राहक दोघांनीही मास्क वापरणे बंधनकारक आहे, मास्कची सक्ती करण्यात यावी, दुकानातील औजारे आणि साहित्याचे वारंवार निजंर्तुकीकरण करणे आवश्यक राहील, एका ग्राहकासाठी वापरलेला टॉवेल दुसºया ग्राहकासाठी वापरु नयेत असे प्रतिबंधात्मक उपाय संदीप बेडसे यांनी प्रशासनाला सूचविले आहेत़
प्रत्येक गावात नाभिक व्यवसाय करणारे समाजबांधव आहेत़ अडीच महिन्यांपासून सर्व व्यवसायिक आणि कारागीरांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे़ अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत़ त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन ३१ रोजी संपणार असून त्यांनी आणखी पाचव्या टप्प्यातील लॉकडाउनचे संकेत शासनाने दिले आहेत़ स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेवून सलून व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी संघटनांनी यापूर्वीच केली आहे़