Allotment of ST passes to the disabled | दिव्यांगांना एस़टी़ पास झाले वाटप
Dhule

धुळे : जागतिक अंपग दिनाचे औचित्य साधुन शहरातील शिवतिर्थ जवळील जेष्ठ नागरिक संघात अपंग बांधवांना मोफत एस़ टी़ पासचे वाटप करण्यात आले़
प्रहार अंपग क्रांती संस्थेतर्फे जागतिक अंपग दिन, वकिल दिन तसेच डॉ़ राजेंद्र प्रसाद यांची जयंतीचे औचीत्यसाधत कार्यक्रम घेण्यात आला़ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक भगवान जगनोर होते़ कार्यक्रमात वाहतूक नियत्रंक चंद्रकांत गोसावी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी धिवरे, अंपग विभागचे पी़यु़पाटील, वैशाली पाटील, वित्त महामंडळ अधिकारी संतोष शिंदे, अनिल सोनवणे यांनी कर्जाबाबत माहिती दिली़ प्रमुख पाहूणे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ईश्वर बोरसे, स्वप्नील जाधव, सोनू राजपूत, उमेश अग्रवाल, मनोज अग्रवाल, रमेश बोरसे, अ‍ॅड़ राजश्री पांडे, अ‍ॅड़ सुनिला शिंदे, अ‍ॅड़ विनोंद बोरसे, अ‍ॅड़ प्रभु गुरव, अ‍ॅड़ भारती शिरसाठ आदी उपस्थित होते़ सुत्रसंचालन संजय सोनवणे, यांनी केले़ मनोगत इंदूबाई शिरसाठ, कल्पनाबाई सोनार, शशिकांत सुर्यवंशी, अ‍ॅड़ कविता पवार, योगेश पवार, नूरशेख यांनी केले़ महेश काटकर, सुनिल घटी सत्कार झाला़

Web Title: Allotment of ST passes to the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.