बालकांच्या हक्कासाठी मानवी साखळी बनून सर्वांनी एकत्रित यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:38 IST2019-11-15T11:37:31+5:302019-11-15T11:38:04+5:30
बालकल्याण समिती : बालदिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

Dhule
धुळे : बालकांच्या न्यायहक्कासाठी समाजाने पुढे यावे यासाठी बालकल्याण समितीने बालदिनाच्या निमित्ताने साक्रीरोड बालगृहात कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी अॅड.अमित दुसाने होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी जी.एन. शिंपी, समाज कल्याण अधिकारी भारत देवरे, जि.प.चे माजी अध्यक्ष अॅड.सारंगी गुजराती, बालगृहाचे अध्यक्ष संचालक पितांबर महाले, पी.ओ. पाटील, एम.एम. बागूल, संस्कार मतीमंदचे अध्यक्ष सुनील वाघ, अधिक्षीका अर्चना पाटील, निंबा मराठे आदी अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बालकल्याण समिती सदस्य प्रा.वैशाली पाटील यांनी बालकल्याण समितीचे कामाची पध्दत आणि या दीड वर्षात केलेले उल्लेखनीय कामाचा आढावा दिला. जिल्ह्यातील विविध संस्था त्रिवेणी महिला विकास , जनसाहस ,जनसेवा , आधार फांऊंडेशन ,फुड बँक कोई भी भुखा नंही रहेगा ,,चाईल्ड लाईन अशा सस्था व त्यांचे पदाधिकारी व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बालकल्याण समितीने बालदिनाचे औचित्य साधून संस्था बालगृहातील कर्मचारी व अधिकारी वर्ग असे एकत्र येऊन बालकांचे हक्क याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी समाज कल्याण प्रभारी अधिकारी भारत देवरे, अॅड. सारंगी गुजराती, संस्था प्रतिनिधी म्हणून सुनील वाघ यांनी आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. अमित दुसाने यांनी मार्गदर्शन केले. आलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी काम करत असताना येणारे अनुभव अडचणी बाबत बालकल्याण समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.
हा बालदिन सर्व बालगृहातील बालकांना बोलावून केक कापून मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.डॉ.सुदाम राठोड यांनी तर आभार मीना भोसले यांनी मानले. या प्रसंगी उमाकांत पाटील, फुड बँकच्या शारदा पाटील, जैन, राजदीप पाटील, प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती.