सर्वच लांब पल्ल्याच्या रेल्वेचे रिझर्वेशन फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 20:21 IST2021-03-24T20:21:14+5:302021-03-24T20:21:24+5:30
दोंडाईचा : रेल्वे प्रशासनाला येताय अच्छे दिन

सर्वच लांब पल्ल्याच्या रेल्वेचे रिझर्वेशन फुल्ल
दोंडाईचा : सुरत- भुसावल रेल्वे लाईनवरील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या सर्वच लांब पल्याचा प्रवाशी गाड्याचे रिझर्वेशन फुल्ल आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला अच्छे दिन दिसत आहेत.
भारतात पुन्हा कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बºयाच प्रवाशी गाडया अजूनही बंद आहेत तर काही जादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. लांब पल्याचा सर्वच प्रवाशी गाड्यांना रिझर्वेशन सक्तीचे आहे. त्या शिवाय गाडीत प्रवेश नाही. भुसावळ - सुरत - भुसावळ रेल्वे लाईनवरील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर बºयाच लांब पल्याचा गाड्या थांबतात. त्यात अजमेर - पुरी, हावडा, नवजीवन, ताप्ती-गंगा, हिसार, अहमदाबाद-बरोनी, भागलपूर, खान्देश-बांद्रा-मुंबई, अमरावती-सुरत या लांब पल्याचा प्रवाशी गाड्यांना थांबा आहे. या सर्वच प्रवाशी गाड्यांना रिझर्वेशन आवश्यक आहे. आज दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आरक्षणाची चौकशी केली असता सर्वच गाड्याचे आरक्षण फुल्ल आहे. केवळ अमरावती-सुरत, खान्देश-बांद्रा मुंबई या गाड्यांचे आरक्षण फुल्ल नव्हते. सुरत - भुसावळ - सुरत या पॅसेंजरला आरक्षणची गरज नाही. खान्देश एक्सप्रेस भुसावल - बांद्रा रविवारी, मंगळवारी, गुरुवारी असते़ तर बांद्रा - भुसावल गाडी शनिवार, सोमवार, बुधवार असते. बुधवारी मुंबईकडे जाण्यासाठी खान्देश नसल्याने आरक्षण फुल्ल नाही.
सुरत - भुसावळ - सुरत या पॅसेंजरला आरक्षणाची गरज नाही़ तरीही प्रवाशी संख्या नाही. लांब पल्याचा गाड्यांना आरक्षण करून प्रवास करणे प्रवाशी पसंत करतात. परंतु उर्वरित गाडया पण सुरू कराव्यात अशी मागणी आहे. अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या प्रवाशांना आरक्षण करण्यास अडचण येत आहे. प्रवाशी गाड्याचे नाव, क्रमाक इंग्रजीत आहे़ गाड्यांचे नाव मराठीत टाकावे ही मागणी आहे. प्रवाश्यांची कोणतीही तपासणी होत नाही.