खून करून पळून जाणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:51 IST2020-01-22T13:51:29+5:302020-01-22T13:51:46+5:30
एलसीबीची कारवाई : संशयित आरोपींनी दिली खुनाची कबुली

खून करून पळून जाणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांना पकडले
आॅनलाइन लोकमत
धुळे :उल्हासनगर येथे एकाचा खून करून खाजगी बसने धुळे मार्गे मध्यप्रदेशात पळून जाणाºया चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ रोजी पहाटे पकडले. संशयित आरोपींनी खून केल्याची कबुली दिली असून, त्यांना उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उल्हासनगर येथील दीपक भोईर याचा नरेश रामसिंग चव्हाण, योगेश सुभाष लाड, राजू मनोहर कनोजीया, अनिकेश विठोबा क्षिरसागर यांनी खून केला. खून केल्यानंतर चौघही आरोपी उल्हासनगर येथून धुळे मार्गे मध्यप्रदेशात एका खाजगी प्रवासी बसने पळून जात होते. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दित हॉटेल द्वारकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ २२ रोजी पहाटे सापळा लावला. खाजगी बसला पाठलाग करून थांबवून त्यात असले संशयित आरोपी यांना चौकशीसाठी मोहाडी पोलीस स्टेशनला नेले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी दीपक भोईर (रा. उल्हासनगर) याचा खून केल्याची कबुली दिली. संशयितांना उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक डॉ. राजू भुजबळ, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, यांच्या पथकातील कॉन्स्टेबल रवीकिरण राठोड, विशाल पाटील, तुषार पारधी, विलास पाटील, केतन पाटील यांनी केली आहे.