सोनगीर येथील टोलनाक्यावर दिवसभर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:52 IST2020-03-23T12:51:55+5:302020-03-23T12:52:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोनगीर : मुबंई-आग्रा महामार्गावर दिवसभर हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रविवारी जनता कर्फ्यू असल्याने या ...

dhulle
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : मुबंई-आग्रा महामार्गावर दिवसभर हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रविवारी जनता कर्फ्यू असल्याने या टोलनाक्यावर शुकशुकाट दिसून आला. दिवसातून वाहनांची ये-जा अगदी नगण्य असल्याचे दिसून आले.
कोरोना या विषाणूचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला सोनगीरवासियांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. ग्रामस्थांनीसकाळी सात वाजल्यापासून गजबजणारी ठिकाणी नागरिकविना ओस पडलेली दिसून आली. गावातील मुख्य बाजारपेठ,भाजी बाजार,कासार गल्ली, बस थांबे आदी महत्वाच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळून जनता कफ्यूर्ला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला
येथील नेहमी दर्शनासाठी गर्दी असलेली विविध धर्माची धार्मिक स्थळे रविवारी ओस पडलेली दिसून आली. तर काही मंदिर आज सकाळ पासूनच बंद ठेवण्यात आली होती.मंदिर बंद राहणार असल्याचे सूचना यापूर्वीच देण्यात आलेली होती. बसस्थानक परिसरातही शुकशुकाट होता.
मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर फाटा देखील गेल्या दोन दिवसा दिवसा पासून बंद करण्यात आला असल्याने येथे देखील शुकशुकाट दिसून आला. तर महामार्गावर देखील वाहनांची वाहतूक मोजकीच असल्याने सर्वत्र शुळशुकाट बघायला मिळाला. या बंद काळात येथील ग्रामपंचयात सोबत पोलीस प्रशासनाची देखील महत्वपूर्ण भूमिका पार पडली. शनिवारी रात्रीच पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्ष प्रकाश पाटील यांनी दैनंदिन व्यवहार व दुकाने बंद ठेवण्याचे आव्हान ग्रामस्थांना केले होते. तरी रविवारी सकाळ पासून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस कर्मचारी विशाल सोनवणे, शिरीष भदाणे,शामराव अहिरे, अजय सोनवणे यांचा सह आदी पोलिसांच्या पथकाने गावात पेट्रोलियम करत ग्रामाथाना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत लोकांना एका ठिकाणी जमा होऊन नये व कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता आपली काळजी घेण्याचे आव्हान करीत होते.