प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेसाठी हवा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:38 AM2021-05-06T04:38:38+5:302021-05-06T04:38:38+5:30

धुळे : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन विभागाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती ...

Air funding for the security of primary health centers | प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेसाठी हवा निधी

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेसाठी हवा निधी

googlenewsNext

धुळे : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन विभागाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडिट पूर्ण झाले आहे. आता त्रुटींची पूर्तता करण्यासाठी निधीची गरज आहे.

भंडारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटनेनंतर सतर्क होत जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट करीत मॉक ड्रील प्रात्यक्षिकदेखील घेतले. फायर ऑडिटनंतर काही त्रुटी समोर आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी निधीकरिता जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. हा निधी मिळाल्यानंतर अग्निउपद्रवाच्या संकटापासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरक्षित होणार आहेत.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सहा महिन्यांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव इलेक्ट्रीकल ऑडिट करण्यात आले. त्यानंतर ऑडिटर एजन्सीने फायर ऑडिट प्रस्तावित केले होते. त्यातच भंडारा येथील घटनेनंतर सतर्क होत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने तत्काळ सजगता दाखवत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या फायर ऑडिट करण्याचे काम हाती घेतले. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी चारही गटविकास अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडिटचे आदेश दिले होते. त्यानुसार, तालुकानिहाय फायर ऑडिटसाठी एजन्सी नियुक्त करत फायर ऑडिटचे काम पूर्ण करण्यात आले. फायर ऑडिटनंतर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मॉक ड्रील प्रात्यक्षिक झाले. फायर ऑडिटच्या दरम्यान ऑडिटर एजन्सीने लहान-मोठ्या त्रुटी दर्शवल्या आहेत. तसेच या त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याची सूचनादेखील जिल्हा परिषदेला केली आहे. दरम्यान, या त्रुटी पूर्ततेसाठी १ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळावा, याकरिता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

अशी आहे जिल्ह्यातील संख्या

जिल्ह्यात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यात धुळे तालुक्यात ११, साक्री तालुका १४, शिरपूर तालुक्यात ८ आणि शिंदखेडा तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूती, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण तसेच सामान्य आजारांची तपासणी होते. आता कोविडच्या संकट कालावधीत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी नियमित कोविड लसीकरण करण्यात येत आहे. तसेच रुग्णांची संख्यादेखील वाढलेली आहे.

Web Title: Air funding for the security of primary health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.