हवाई दलातील अभिनंदन यांची सुभाष भामरेंकडून सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:50 IST2019-03-03T22:49:59+5:302019-03-03T22:50:21+5:30

धाडसी शौर्याचे केले कौतूक : रुग्णालयात जावून केली विचारपूस

Air congratulations to Subhash Bhimeron for congratulations on the Air Force | हवाई दलातील अभिनंदन यांची सुभाष भामरेंकडून सदिच्छा भेट

हवाई दलातील अभिनंदन यांची सुभाष भामरेंकडून सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची रुग्णालयात जावून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी रविवारी सदिच्छा भेट घेतली़ त्यांच्या कुटुंबियांना यावेळी धीर देण्यात आला़ यावेळी त्यांच्यासोबत हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते़  
भारतीय हवाई दलातील धाडशी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे मायदेशी आल्यानंतर रविवारी सकाळी भारताचे संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांची सैन्यदलाच्या रुग्णालयात जावून सदिच्छा भेट घेतली.  
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या तब्येतीची आस्थेवायीकपणे त्यांनी विचारापूस देखील केली. यावेळी त्यांच्या समवेत संरक्षण मंत्रालयातील अधिकारीही उपस्थित होते. अभिनंदन वर्तमान यांनी ना. डॉ. सुभाष भामरे यांच्याशी सुमारे विस मिनीटे दिलखूलासपणे गप्पा केल्या. त्यांनी देशासाठी केलेल्या धाडशी शौर्याचे कौतूक करण्यात आले़ त्यानंतर डॉ़ भामरे यांनी अभिनंदन यांच्या कुटूंबियांनाची चौकशी केली आणि धीर दिला.
अभिनंदन आणि डॉ़ भामरे यांच्यात थोडावेळ संवाद देखील झाला़ त्यांनी उदभवलेली परिस्थिती समजून घेतली़ 

Web Title: Air congratulations to Subhash Bhimeron for congratulations on the Air Force

टॅग्स :Dhuleधुळे