अहिराणी भाषिकांनी प्रयत्न करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST2021-03-14T04:31:47+5:302021-03-14T04:31:47+5:30
धुळे- सध्या अहिराणी भाषा लुप्त होत चालली असून अहिराणी भाषिक लोकांनाच आपली मायबोली बोलताना लाज वाटते. पूर्वी लग्नामध्ये अहिराणी ...

अहिराणी भाषिकांनी प्रयत्न करणे गरजेचे
धुळे- सध्या अहिराणी भाषा लुप्त होत चालली असून अहिराणी भाषिक लोकांनाच आपली मायबोली बोलताना लाज वाटते. पूर्वी लग्नामध्ये अहिराणी गाणी म्हटली जायची. परंतु आता मुली व सुना मराठी व हिंदी गाणी म्हणतात. अहिराणी भाषा काळाच्या पडद्याआड लुप्त होऊ नये, यासाठी अहिराणी भाषिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत खान्देश हित संग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष लीलाधर सोनार यांनी व्यक्त केले.
सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त ‘अहिराणी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात यावा, असा ठराव यावर्षीच्या अहिराणी साहित्य संमेलनात करण्यात आला होता. त्यानुसार यावर्षी ‘उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ’ संचलित ‘जागतिक अहिराणी संवर्धन परिषदेच्या’ माध्यमातून विविध ठिकाणी ‘अहिराणी मास’ पाळला गेला. गुरूवारी ११ रोजी संध्याकाळी ५ वाजता महाराजा गायकवाड यांच्या जयंती निमित्त खान्देश हित संग्राम संघटनेतर्फे शहरातील गोंदूर रस्त्यावरील आर. आर. परदेशी प्राथमिक शाळेत कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लीलाधर सोनार होते. यावेळी त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी पत्रकार गोकुळ देवरे, श्रीकृष्ण बेडसे, रवींद्र पानपाटील, नरेंद्र देवरे, विलास पाटील, अनिता बैसाणे, सर्वेश पटेल, आकाश महाले, जितेंद्र गायकवाड, छोटू मोरे, नितीन अहिरराव आदी उपस्थित होते.