निवेदनात म्हटले आहे की, कृषी पदवीच्या अंतिम वर्षामध्ये कृषी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाच्या कार्याचा अनुभव यावा, यासाठी विशेष कार्यक्रम असतो. यामध्ये विद्यार्थी ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून अनुभव घेत असतात. त्यासाठी त्यांच्या दैनंदिन खर्च व उदरनिर्वाहासाठी शासनाकडून ३००० रुपये प्रती महिना भत्ता दिला जातो. हा भत्ता आणि शिष्यवृत्ती या वेगवेगळ्या असतात. मात्र कृषी महाविद्यालयात भत्ता किंवा शिष्यवृत्ती कोणताही एकच लाभ विद्यार्थ्याला मिळेल असे सांगण्यात येऊन विद्यार्थ्यांची भत्त्याची रक्कम थकीत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कृषी विद्यार्थ्यांची थकीत असलेली सर्व भत्त्यांची रक्कम तत्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावी; अन्यथा विद्यार्थी हितासाठी अभाविप आपल्या महाविद्यालयात तीव्र आंदोलन करील.
निवेदन देतेवेळी अभाविप धुळे शहर मंत्री भावेश भदाणे, आदिनाथ कोठावदे, दत्तात्रय माळी, अविनाश उखंदे उपस्थित होते.