४० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कायनकडा धरण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:57 IST2020-08-07T11:57:32+5:302020-08-07T11:57:56+5:30
आमदार मंजुळा गावीत यांनी साडीचोळीचा अहेर अर्पण करीत केले जलपूजन

४० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कायनकडा धरण भरले
आॅनलाइन लोकमत
म्हसदी (जि.धुळे) :यावर्षी होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे येथील कायनकडा धरण चाळीस वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर यंदा पुर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे गुरूवारी साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते धरणात साडी चोळीचा आहेर अर्पण करत जलपुजन करण्यात आले.
१९९५ मध्ये हे धरण ७५ टक्के भरले होते. त्यानंतर धरणात पाणी आले नाही.मात्र ४०वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हे धरण आज ओव्हरप्लो झाले. परिणामी पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सांडव्याची उंची वाढवण्याची मागणी माजी सरपंच चंद्रकांत देवरे यांनी आमदार गावीत यांच्याकडे केली. तसेच विश्वेश्वर महादेव मंदीराच्या जवळ असलेल्या नदींच्या त्रिवेणी संगमावर देखील आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते साडी चोळीचा आहेर अर्पण करत जलपुजन करण्यात आले.गेल्या वर्षी परिसरात पाऊस चांगला झाल्यामुळे धरणात पाणी आल. गावातील तरूणांनी देखील पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवल्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे,अशी प्रतिक्रिया धनदाई देवी तरूण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.तुळशीराम गावीत, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, माजी सरपंच चंद्रकांत देवरे, सरपंच कुंदन देवरे,ग्रामपंचायतीचे सदस्य गंगाराम देवरे,धनदाई देवी तरूण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, संचालक यशवंतराव देवरे, डॉ. भास्कर देवरे,पुरोहित गणू महाराज दिक्षीत, शिवसेनेचे पंकज मराठे, काळगावचे सरपंच संजय भामरे,मंगेश नेरे, किरण देवरे, देवेंद्र देवरे, दादाजी बेडसे, अरूण बेडसे, विनायक ठाकरे, हिम्मतराव देवरे, प्रविण खैरनार, भाऊसाहेब पाटील, निंबाजी देवरे, कुणाल भदाणे, मुन्ना देवरे, अजित बागुल, भिकनराव भदाणे, रोहित देवरे, एस.डी.देवरे, भिकनराव देवरे, सुभाष चित्तम, ककाणीचे माजी सरपंच शिवदास अहिरे आदी उपस्थित होते.