केंद्राच्या सौर ऊर्जा धोरणाला ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:39 IST2019-11-17T22:39:27+5:302019-11-17T22:39:52+5:30
खान्देश सोलर असोसिएशन : पत्रकार परिषदेत आरोप

केंद्राच्या सौर ऊर्जा धोरणाला ग्रहण
धुळे : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ग्राहक विरोधी प्रस्ताव जाहीर केला़ त्यानुसार, सद्याच्या युनीट ते युनिट परतावा न देता ग्राहकाने निर्माण केलेली वीज ३ रुपये ६५ पैशांनी विकत घेतली जाणार असून तीच खरेदी केलेली वीज पुन्हा ग्राहकालाच तब्बल ८ ते ९ रुपये युनिट एवढ्या दराने विक्री केली जाणार आहे़ आयोगाच्या या उफराट्या नियमाला विरोध नोंदविण्यात आला़ तसेच केंद्राच्या सौर उर्जा धोरणाला वीज नियामक आयोगाचे ग्रहण लागल्याची टीका खान्देश सोलर असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत केली़
एकीकडे केंद्राच्या सौर उर्जा निर्मितीस प्राधान्य देण्याच्या धोरणास चालना मिळावी म्हणून सबसिडी जाहीर केली जात असताना दुसरीकडे मात्र आयोगाकडून पिळवणूक होत आहे, असा आरोप खान्देश सोलर असोसिएशनचे चेतन वानखेडे, किशोर पोतदार, विजय चौधरी, हितेंद्र चौधरी, नितीन कासार, भागवत सोनगीरे, रमाकांत पेडवाल, समीर देशमुख यांच्यासह इतरांनी यावेळी बोलताना केला़