शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

वाहतूक कोंडीत अडकले ‘प्रशासन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:13 IST

बाजारपेठेत गर्दी : आग्रारोडवर मनपा आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचे वाहन गर्दीत अडकले

धुळे : शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी संजय यादव यांनी ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविला. ऐरवी नेहमीसुद्धा एवढी गर्दी कधी होत नाही. तेवढी गर्दी धुळेकरांनी लॉकडाउनच्या काळात केली. त्याचा प्रत्यय स्वत: महापालिका आयुक्त अजीज शेख आणि पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनाही आला. ते बाजारपेठेची पाहणी करण्यासाठी फिरत असतांना आग्रारोडवर त्यांची गाडी देखील ट्रॅफीकमध्ये अडकली होती. त्यानंतर पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांना तेथून काढले ही पण काहीवेळेनंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली होती. धुळेकरांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे तीन तेरा करीत लॉकडाउन आणि कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचे दाखवून दिले. शहरात लॉकडाउन आहे की नाही, असा प्रश्न त्यामुळे साहजिकच सर्वांना पडला.शहरात आग्रारोड, महात्मा गांधी चौक परिसरातही सकाळी तीच परिस्थिती होती.कंटेन्मेट झोनमध्ये गर्दी - कंटेन्मेट झोन जाहीर झालेल्या ऊसगल्लीत ज्याठिकाणी चार रुग्ण आढळले आहे. त्याठिकाणी शुक्रवारी व्यापारी दुकाने सुरु होती. त्या भागात नागरिक सहजपणे प्रवेश करुन ये - जा करतांना दिसून आले.फिजिकल डिस्टन्सिंग - शहरात फिजिकल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावण्याबाबत तर न बोललेच बरे असे सांगावेसे वाटते. कारण अगदी नेहमीप्रमाणे गर्दी करीत भाजीपाला खरेदी आणि अन्य व्यवहार केले जात होते. शहरातील अनेक भागात सर्वच दुकाने छुप्या पद्धतीने सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाउन हे फक्त नावालच आहे, असे स्पष्ट दिसते.पुलावर गर्दी - देवपूर आणि धुळे शहराला जोडणाºया पांझरा नदीच्या पुलांवर तर दोन्ही बाजुने येणाºया दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे सकाळी ट्रॅफीक जाम होणे नित्याची बाब झाली आहे. शुक्रवारीही सकाळी तिच परिस्थिती होती.परिसरात गाडयांच्या कर्णकर्कश आवाज होत होता. याठिकाणी उभ्या अनेक लोकांनी तर याचे व्हिडीओ काढले तर काहींनी त्याचे फोटो काढण्यातच मग्न दिसले. कोणालाही लॉकडाउन अथवा कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य दिसले नाही.याठिकाणी पोलीस बंदोबस्ताला होते. परंतू ते कोणाकोणाला अडवतील.कारण सर्वच चारचाकी आणि दुचाकीवाले कोण कोणाचा ओळखीचा असेल, अडविले तर फोन येईल आणि विनाकारण आपल्या माघार घेत सोडावे लागेल. त्यापेक्षा जो येतो आणि जो जातो आहे. त्या सर्वांचा मार्ग मोकळा करण्यातच तो गुंतलेला दिसला. शासनातर्फे कोरोनाचे रुग्ण शहरात वाढत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाय योजना आणि लॉकडाउन जाहीर केला आहे. परंतू याकडे धुळेकर अजुनही गांभीर्याने लक्ष देतांना दिसून येत नाही. नागरिक रस्त्यावर दिसत आहे. कोणीही थांबण्यास तयार नाही. प्रत्येकाला शहरात काही न काही काम असल्यासारखे फिरतांना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण अशापद्धतीने जर गर्दी होत गेली तर त्यातून संसर्ग वाढण्याची भीती जास्त आहे. धुळेकरांना आतातरी याचे गांभीर्य ओळखावे, अशी अपेक्षा आहे.बेकायदेशीर बंद रस्त्यामुळे होतोय् त्रासएकीकडे मनपा प्रशासनाने बंद केलेले रस्ते आपल्या सोयीसाठी खुले केले जात आहे. तर दुसरीकडे खुले रस्ते नागरिक विनाकारण बंद करीत आहेत. या दोन्ही गोष्टी प्रशासनाने बंद केल्या पाहिजे. कारण विनाकारण बंद केलेल्या रस्त्यामुळे जे नेहमी खरोखर कामासाठी बाहेर जातात. त्या सर्व लोकाना याचा त्रास होतो. लोकांनी रस्ता बंद केल्यामुळे त्यांना एक ते दोन किलोमीटरचा फेरा करीत दररोज जावे लागते. तसे होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने असे विनाकारण बंद रस्ते खुले केले पाहिजे. तसेच याउलट कन्टेन्मेट झोनमधील जे रस्ते नागरिकांनी आपल्या सोयीसाठी न विचारता सुरु केले आहेत. ते पुन्हा बंद करण्यात यावे. अन्यथा कन्टेन्मेट झोनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची जास्त भिती आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.शहरात रस्ते बंद करुन क्रिकेटशहरातील काही कॉलनी परिसरात आणि पेठ भागातील गल्लीमध्ये आपल्या सोयीनुसार मनपा प्रशासनाने सांगितले नसले तरी रस्ते अडथळे निर्माण करुन ते बंद केले आहे. ते सुद्धा आपल्या सोयीसाठी कारण रस्ते बंद करुन त्यावर सर्रासपणे क्रिेकेट खेळतांना किंवा घोळका करुन ओटयावर बसून गप्पा मारतांना तरुण दिसतात. रस्ता बंद हा घरात थांबण्यासाठी आणि कोणी बाहेरचा व्यक्ती येऊ नये यासाठी असतांना त्या नियमाच्या अगदी विरुद्ध कृती नागरिक करीत आहे. रात्री उशीरापर्यंत आणि दुपारी तरुण मंडळी क्रिेकेट खेळतांना दिसत आहे. याकडेही जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ते बंद केले पाहिजे. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे सतत सुरु असलेल्या या गोष्टीमुळे स्पष्ट जाणवते. आतातरी ते बंद व्हावे अशी अपेक्षा आहे.शहरातील बंद रस्ते स्वत:च सुरु केलेशहरात एकूण २४ कन्टेन्मेट झोन तयार करण्यात आले आहेत. त्या परिसरातील सर्वच रस्ते मनपा प्रशासनाने बंद केले आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाने रस्त्यावर लाकडी बांबू आणि अन्य साहित्याने ते बंद केले आहे. परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रस्त्यावरील अडथळे दूर करुन रस्ते सुरु केले आहे. त्यावरुन आता सर्रासपणे वाहतूक सुरु झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीला येणे आणि आतील व्यक्ती बाहेर जाणेही शक्य नाही, असा नियम असतांना त्याकडे दुर्लक्ष करुन ही वाहतूक सुरु झाली आहे. मनपा प्रशासन आणि पोलिसांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ते रस्ते पुन्हा बंद केले पाहिजे. तसेच ते करणाºया विरोधात आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Dhuleधुळे