सिक्युअर प्रणालीत फोटो अपलोड केल्यावरच प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:19 IST2020-03-07T22:19:33+5:302020-03-07T22:19:59+5:30
मनरेगा । मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना पत्र

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रोजगार हमी योजने अंतर्गत सिक्युअर ही प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पासुन या प्रणाली अंतर्गत कामाचे अंदाजपत्रक तयार करुन त्याला प्रशासकीय मान्यता देणे सक्तीचे आहे. यानुसार जिल्ह्यात नाडेप, व्हर्मी कंपोस्ट व गाय गोठ्यांच्या प्रत्यक्ष मंजुरीची प्रक्रीया राबविण्यात आली आहे. मात्र संबधीत तांत्रीक सहाय्यक यांनी कामाचे अंदाजपत्रक तयार करतांना पत्यक्ष काम सुरु होणाºया स्थळांचा फोटोच अपलोड केलेले नाहीत. यामुळे लाभार्थ्यांनी मंजुरीपुर्वी काम सुरु केले आहे किंवा काय याचा बोधच होत नाही. शिवाय नाडेप, व्हर्मी कंपोस्ट, गाय गोठे आणि इतर कामे रोजगार हमी योजनेच्या मानकाप्रमाणे करण्यात येत नसल्याचे खुद्द मुख्यकार्यकारी अधिकाºयांच्या पहाणीत समोर आले आहे. शिवाय कामाची गुणवत्ता देखील राखण्यात येत नाही. सेक्युअर प्रणाली मध्ये शिंदखेडा तालुक्यातील ८५ सिंचन विहीरी आणि १ सार्वजनिक विहीर असे ८६ कामे तर शिरपुर तालुक्यातील २८ सिंचन विहीरी व १ सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर असे २९ कामांना तांत्रीक मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाºयांकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र जो पर्यंत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाचे फोटो अपलोड करण्यात येत नाहीत. तो पर्यंत या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येणार नसल्याच्या सुचना मुख्यकार्यकारी अधिकाºयांनी दिल्या आहेत.
या संदर्भात संबधीत ग्रामपंचायत आणि तांत्रीक सहाय्यक यांना कामाची गुणवत्ता राखण्या सदंर्भात सुचना देण्यात यावी. तसेच काम गुणवत्तापुर्ण झाले नाही. त्यात त्रृटी आढळल्या तर या संदर्भात अधिकारी व कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा मुख्यकार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. या संदर्भात चारही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे.
आॅनलाईन प्रणालीतील कामाता दिरंगाई करणाºयांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी यांनी दिला आहे़
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत धुळे व साक्री तालुक्यातील तांत्रीक सहाय्यकांनी नाडेप, व्हर्मी कंपोस्ट व गोठ्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या स्थळांचे फोटो सेक्युअर सिस्टीम मध्ये अपलोड केलेले नाहीत. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी नाराजी व्यक्त करत गटविकास अधिकाºयांना तांत्रीक सहाय्यकांना कामाचे फोटो नोटकॅम मध्ये काढुन सिक्युअन प्रणालीत अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.