धुळ्यात प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्या वाटपाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:06 IST2020-02-12T23:06:28+5:302020-02-12T23:06:52+5:30
जनजागृती : महापालिका, इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मानवी आरोग्यास हाणीकारक तसेच पर्यावरणाचा होणारा ºहास थांबविण्यासाठी शासनाने प्लास्टिक पिशव्यांना बंदी घातली आहे़ नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी बुधवारी मनपात १ हजार ५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले़
महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बुधवारी दुपारी १ वाजता प्लास्टिक बंदीवर जनजागृती होण्यासाठी महापालिका व इनरव्हिल क्लब धुळे क्रासरोड यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आला़ यावेळी आयुक्त अजिज शेख, जयहिंद महाविद्यालयाच्या प्रा़ उषा पाटील, क्लबच्या सदस्या सोनाली पाटील, रश्मी बोरसे, वसुधा चंद्रचुड, कल्पना शाह, शुष्मा अग्रवाल, रेखा जैन, भावना देवरे, मिनल अग्रवाल, मनिषा पाटील, विद्या कुल्थे, वैशाली शिसोदे आदी उपस्थित होते़
यावेळी उषा पाटील म्हणाले की, प्लॉस्टिक पिशव्याच्या मानवी आरोग्यासाठी घातक आहे़ त्यामुळे भविष्यात मोठ्या अडचणीला सामना करावा लागु शकतो़ शासनाच्या आदेशानुसार प्लॉस्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे़ मात्र तरीही नागरिकांमध्ये जनजागृती नसल्याने कळत नकळत वापर होतो़ तो पुर्णता थांबविण्यासाठी प्रत्येकांनी प्लॉस्टिक मुक्त शहर होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी गरज आहे़
प्लॉस्टिक पिशव्यांना पर्यायी मार्ग म्हणुन कागदी व कापडी पिशव्यांचा वापर नागरिकांनी करण्यासाठी आवाहन करण्याचे सांगितले़ कार्यशाळेत पंधराचे कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले होते़
देशात प्लास्टीक बंदी लागू केल्यानंतर महानगरपालिकेने धुळे शहरात प्लास्टीकविरोधी मोहिम तीव्र केली होती़ त्यामुळे प्लास्टीक कॅरिबॅग वापरावर नियंत्रण आले होते़ पंरतु कारवाई थंडावल्याने शहरात प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे़