कोविड सेंटरवर निकृष्ट अन्नपुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 14:34 IST2020-08-07T14:33:49+5:302020-08-07T14:34:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :शिंगावे येथील कोविड केअर सेंटरवर मिळत असलेल्या निकृष्ट अन्नावर रुग्णांनी नाराजी व्यक्त केली होती. अन्नपुरवठा ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :शिंगावे येथील कोविड केअर सेंटरवर मिळत असलेल्या निकृष्ट अन्नावर रुग्णांनी नाराजी व्यक्त केली होती. अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला रुग्णांनी एकत्रित येत जाब विचारला होता. या प्रकरणाची दाखल आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. अन्नपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावणार असून दंडही ठोठावणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
गुरुवारी रात्री रुग्णांना देण्यात आलेली खिचडी कच्ची होती. तसेच शुक्रवारी नाश्ताही उशिरा आल्यामुळे रुग्णांनी रोष व्यक्त केला. कोविड केअर केंद्राच्या व्हरांड्यात एकत्र येत त्यांनी अन्नपुरवठा करणाऱ्या महिलॆला खडेबोल सुनावले होते. यापुढे असा प्रकार घडला तर संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात येईल अशी माहिती डॉ.मनीष पाटील यांनी दिली.