मापात पाप करणाऱ्या तीन रेशन दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 14:23 IST2020-05-14T14:23:16+5:302020-05-14T14:23:38+5:30

पुरवठा विभाग : दोघांचे परवाने निलंबीत, एकाची अनामत जप्त

Action on three ration shops for measuring sin | मापात पाप करणाऱ्या तीन रेशन दुकानांवर कारवाई

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मापात पाप करणाºया आणि गावकऱ्यांसोबत दादागिरी करणाºया तीन रेशन दुकानांवर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे़
दोन दुकानांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत तर एका दुकानाची अनामत जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली़
साक्री तालुक्यातील जैताणे येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२, नाडसे येथील दुकान क्रमांक १३३ आणि शिरपूर तालुक्यातील जामन्यापाडा येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ८६ या तीन दुकानांच्या विरोधात शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी वाढल्या होत्या़ ग्राहकांना पावती न देणे, जास्तीच्या दराने धान्य वितरीत करणे, शासनाने विहित केलेल्या प्रमाणात धान्य न देणे, ग्राहकांशी उध्दटपणे वागणे अशा आशयाच्या तक्रारी पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या़
या तक्रारींची पुरवठा विभागाने सखोल चौकशी केली असता त्यात तथ्य आढळल्याने नाडसे येथील रेशन दुकानाची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे तर जैताणे आणि जामन्यापाडा येथील दुकानांचे प्राधिकारपत्र तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी दिली़
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासुन सर्व व्यवहार ठप्प झाल्याने रोजगार बंद होवून गरिबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अशा परिस्थितीत शासनाने स्वस्त धान्य दुकानातुन पुरेसे धान्य उपलब्ध करुन दिले आहे़ अंत्योदय, प्राधान्य कुटूंबांना नियमीत धान्यासह मोफत तांदूळ मिळत आहे तर लाभार्थी नसलेल्या केशरी शिधापत्रिका धारकांना देखील स्वस्त धान्य मिळत आहे़ धान्याच्या वितरणावर पुरवठा विभागाची करडी नजर आहे़
याआधी देखील दोन ते तीन रेशन दुकानांवर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे़ आता पुन्हा कारवाई झाल्याने मापात माप करणाºया रेशन दुकानदारांवर वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे़

Web Title: Action on three ration shops for measuring sin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे