विसरवाडी येथे एका विद्याथ्र्यावर कारवाई
By Admin | Updated: February 28, 2017 23:52 IST2017-02-28T23:52:01+5:302017-02-28T23:52:01+5:30
नवापूर तालुक्यात विसरवाडी येथील परीक्षा केंद्रातील परीक्षार्थी विद्याथ्र्यावर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली़

विसरवाडी येथे एका विद्याथ्र्यावर कारवाई
नंदुरबार : जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत़ मंगळवारी इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नवापूर तालुक्यात विसरवाडी येथील परीक्षा केंद्रातील परीक्षार्थी विद्याथ्र्यावर कॉपी बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली़
शिक्षण विभागाकडून नियुक्त केलेल्या चार भरारी पथकांपैकी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याच्या भरारी पथकाने दुपारी एक वाजेच्या सुमारास विसरवाडी येथे भेट दिली़ या वेळी त्यांनी विद्याथ्र्याची झडती घेतल्याने एकाकडे कॉपी आढळून आली़ त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली़ जिल्ह्यातील 20 परीक्षा केंद्रांवर 16 हजार 74 परीक्षार्थी पहिल्या पेपरला हजर होत़े परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर केंद्रांबाहेर व आत पोलीस बंदोबस्त तैनात होता़ - पाहा/हॅलो