अन्याय करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:12 IST2020-06-08T21:11:50+5:302020-06-08T21:12:11+5:30
भीम आर्मी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडॉऊनच्या काळात दलित- आदिवासींवर होत असलेल्या अत्याचार प्रकरणांत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिम आमीर्ने गृहमंत्र्यांकडे कली आहे. सोमवारी भिम आर्मीच्या पदाधिका?्यांकडून जिल्हाधिका?्यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊन केले असतांना महाराष्ट्रात दलित व आदिवासींवर अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत त्या घटनांची सखोल चौकशी करून पिडीतांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याच मतदारसंघातील नरखेड येथील गावगुंडानी दलित तरूणाची हत्या केली आहे. त्यात पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे. त्या युवकाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीवर ३०२ व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेत शिर्डी येथील दलीत तरूणाच्या हत्या प्रकरणात आरोपीच्या मारेक?्यांना सरकारने प?रोल मंजूर केला आहे. त्या आरोपींचा प?रोल तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी भिम आमीर्ने केली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील मांगवडगाव येथील अत्याचार झालेल्या आदिवासी बांधवाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. तसेच मराठवाड्यातील गायरान जमीन कसणा?्या दलीत व आदिवासींना प्रस्थापित राजकारणी त्रास देत आहेत. त्या जमिनी तात्काळ दलीत व आदिवासींच्या नावावर करण्यात याव्यात आदि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका?्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी भिम आमीर्चे राज्य उपाध्यक्ष राहूल वाघ, धुळे जिल्हा प्रभारी भारत देवरे, भुषण वाघ आदि उपस्थित होते.