हातभट्टीवर कारवाई, १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:35+5:302021-09-11T04:37:35+5:30

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पांझरा नदीकाठी असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी भीमा भिकन पवार नामक ...

Action on hand furnace, 19,000 items confiscated | हातभट्टीवर कारवाई, १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

हातभट्टीवर कारवाई, १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पांझरा नदीकाठी असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी भीमा भिकन पवार नामक संशयित हातभट्टीची दारू तयार आणि विक्री करताना आढळून आला. या कारवाईत दहा लिटरच्या प्लास्टिकच्या ड्रममधील ६० लिटर गावठी हातभट्टीची दारू, ३ हजार ५०० रुपयांचे ८ मोठे ड्रम भरून गूळमिश्रित रसायन, ३ हजार ६०० रुपयांच्या ४ प्लास्टिकच्या ड्रममध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, ३ हजार २५० रुपयांचे दहा पत्र्याचे ड्रम, असा एकूण १८ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दत्तू काशीनाथ कोळी यांच्या तक्रारीवरून भीमा भिकन पवार या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पिंपळनेर पोलीस करीत आहेत.

Web Title: Action on hand furnace, 19,000 items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.