सोनगीर - मुंबई आग्रा महामार्गावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे. वाघाडी (त़ शिंदखेडा) येथील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले संदीप अरविंद पाटील हे आपल्या ताब्यातील दुजाकी मोटारसायकल क्रमांक एमएच १४ डीझेड ५१०५ ने धुळ्याकडे शाळेतील कागद पत्र घेण्यासाठी जात असताना महामार्गावरील हॉटेल पंकजच्या जवळ मागून भरधाव वेगाने येणाºया एका अज्ञात वाहनाने धडक दिली़ यात संदीप हे जागीच मृत झाले़ अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सोनगीर टोल प्लाझाचे डॉ़ भूषण जाधव, प्रशांत गवळे, विनोद पिसे, सुमीत शिंदे, मोहसीन शेख यांनी धाव घेत मदत कार्य केले़ त्या पाठोपाठ सोनगीर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते़ संदीप पाटील यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले़ पंडित यशवंत पाटील यांनी सोनगीर पोलिसात माहिती दिली़ त्यानुसार नोंद घेण्यात आली़ संदीप पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे़
सोनगीरजवळील अपघात, दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:01 IST