साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:12 IST2020-02-16T22:12:35+5:302020-02-16T22:12:55+5:30

सांगवी। उभ्या कंटेनरवर बस आदळली, इंदूर येथील ५५ भाविक जखमी

Accident of devotees traveling to Shirdi to meet Saibaba | साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : भरधाव वेगातील लक्झरी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात इंदूर येथील ५५ भाविक जखमी झाले़ त्यापैकी १३ जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ उर्वरीत जखमींना इंदौर येथे हलविण्यात आले़
इंदौर येथील एकाच कॉलनीतील भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतांना मुंंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी गावाजवळ शनिवारी दुपारी साडेतीनला हा अपघात झाला़
इंदूर येथील अन्नपूर्णा मंदिर परिसरातील जयजगत कॉलनी व केशव नगरातील भाविक एम़पी़०९-एफए-९९७९ क्रमांकाच्या खाजगी लक्झरी बसने शिर्डी येथे दर्शनासाठी शनिवारी सकाळी निघाले होते़ सांगवी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला कंटनेर क्रमांक एम़पी़३३-एच-१३२६ हा उभा होता़ त्यावेळी लक्झरी बस चालक अपसर खान अमर खान (५०) रा़ देवास याच्या शेजारी बसलेल्या एका इसमास डुलकी लागल्यामुळे तो इसम चालकाच्या अंगावर पडला़ बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस कंटेनरवर जावून आदळली़ त्यामुळे लक्झरी बसच्या पुढील भागाचा चक्काचूर होवून गाडीतील सर्वच प्रवाशी जखमी झाले़
घटनेचे वृत्त कळताच सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह जखमींना मिळेल त्या वाहनाने शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना केले़ याकामी जि़ प़ सदस्य योगेश बादल, तरूण शर्मा, भास्कर धोबी आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले़
या अपघातात विक्की लुलचंद केशवाणी (४६), पूजा विक्की केशवाणी (४५), विकास गुरूदास हासवाणी (२९), नंदलाल राजदेव (३६), आशा नोमाणी (६०), धरमपाल नंदराम उधाणी (३५), चिराग दीपक उधाणी (४), दीपक घनश्याम उधाणी (३४), जयपाल दासवाणी (२५), घोलक कटारीया (५०), करीना कटारीया (१५), मंजू शर्मा (५०), हनी रामदेव (३०), रीना हनी रामदेव (३०), सतिष तलरेजा (५९), कोमल तलरेजा (५२), आशिया वावजा (३०), दीपा उधाणी (३९), हिरालाल सचदेव (४२), अशोक नारायणदास (५६), कोमल वधवा (५४), गीता कटारीया (५०), सिया उधाणी (२२), रोनशी लुधवाणी (३३), कोहिनूर लुधवाणी (१०), दिपीका मोटवाणी (२३), भारती राजकुमार मोटवाणी (४७), नयन अडवाी (१७), अशोककुमार बदलाणी (५२), राजेश जगवाणी (५२), महेश हरीयानी (५९), विशाल बहराणी (३०) सर्व राहणार इंदौर हे प्रवाशी जखमी झालेत़ सांगवी पोलिसांसह नगरसेवक चंदनसिंग राजपूत, मयूर राजपूत, कल्पेश राजपूत, गजू राजपूत, राकेश सनेर, किशोर चव्हाण, राजकुमार हासवाणी, विनोद जगलाणी, राजेश चांदवाणी, अशोक डेबराणी यांच्यासह गावातील तरुण आणि पत्रकारांनी मदत कार्य केले़

Web Title: Accident of devotees traveling to Shirdi to meet Saibaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे