आवास योजनेतून त्वरीत घरे मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:07 IST2020-02-04T23:06:45+5:302020-02-04T23:07:14+5:30
पुरग्रस्तांची मागणी : मनपा आयुक्तांना निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील पांझरा नदी काठावरील पुरग्रस्त नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधून मिळावित अशी मागणी पुरग्रस्तांनी केली आहे़
सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पुरग्रस्तांना प्राधान्याने घरे बांधून द्यावीत असा शासन निर्णय आहे़ त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीबाबत चौकशी करुन घरे बांधून देण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश ११ सप्टेबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये महानगरपालिकेला दिले होते़ परंतु महानगरपालिकेने त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही़ त्यामुळे पुरसग्रस्ताच्या घरांच्या बांधकामाला विलंब होत आहे़ याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही त्वरीत करावी यासाठी सौ़ सरलाबाई निकम, गितांजली जाधव, राजु बैसाणे, मुकेश वाघ, नागेश शिरसाठ, संजय मोरे, जानकीराम कदम यांच्यासह पुरग्रस्तांनी महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेवून निवेदन दिले़ त्वरीत मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पुरग्रस्तांनी दिला आहे़