लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 19:11 IST2023-04-25T19:11:10+5:302023-04-25T19:11:55+5:30

धुळ्यानजीक नकाणे तलाव परिसरातील घटना

Abusing a minor girl by luring her into marriage; A crime against one in dhule | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरोधात गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाविरोधात गुन्हा

राजेंद्र शर्मा

धुळे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन युवतीवर धुळ्यातीलच एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली. नकाणे तलाव परिसरात तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्याने लग्नास नकार दिल्याचे कळताच पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

संशयित तरुणाविरोधात अत्याचारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला. लग्नाचे आमिष दाखवून धुळ्यातील एका तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. महाविद्यालयात तिला मिठीत घेतले. तसेच वाढदिवस साजरा करण्याचे निमित्त करून तो तिला नकाणे तलाव परिसरात घेऊन गेला. तिथेही तिच्यावर अत्याचार केला. अशा प्रकारे अतिप्रसंगाचा प्रसंग वारंवार घडला. पीडितेला जीवे ठार मारण्याची आणि स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देऊन त्याने अतिप्रसंग केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. अत्याचाराचा प्रकार जुलै २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या दरम्यान घडला. यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविराेधात सोमवारी शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Abusing a minor girl by luring her into marriage; A crime against one in dhule