कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधारकार्ड बंधनकारक, पंचायत समितीच्या सभेत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST2021-03-10T04:36:11+5:302021-03-10T04:36:11+5:30

धुळे तालुक्यातील अंगणवाड्यांना बेबीकेअर किटचे वाटप सध्या करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठस्तरावरून पंचायत समितीकडे किट प्राप्त णाल्या आहेत. नवीन ...

Aadhaar card mandatory for corona preventive vaccination, explanation of health department in the meeting of panchayat committee | कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधारकार्ड बंधनकारक, पंचायत समितीच्या सभेत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आधारकार्ड बंधनकारक, पंचायत समितीच्या सभेत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

धुळे तालुक्यातील अंगणवाड्यांना बेबीकेअर किटचे वाटप सध्या करण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठस्तरावरून पंचायत समितीकडे किट प्राप्त णाल्या आहेत. नवीन अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमंतराव भदाणे यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतून शेतकऱ्यांना पाच एचपीचे कृषीपंप व ताडपत्रीचा लाभ देण्यात आल्याचे कृषी अधिकारी चौधरी यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांसाठी तीन योजना सुरू केल्या आहेत. यात महाकृषीपर्व योजनेतून १४ एप्रिलपासून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी किमान १० एकरचा निकष लावला आहे. दिवसा आठ तास वीजपुरवठा असेल तर रात्री १० तासांचा वीज पुरवठा करण्यात येईल. यामुळे वीज पुरवठा कधी हवा आहे, याविषयी शेतकऱ्यांनी कळवावे, असे आवाहन करण्यात आले. तर दुरुस्तीसंदर्भातील आठ कामे निविदास्तरावर असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले.

Web Title: Aadhaar card mandatory for corona preventive vaccination, explanation of health department in the meeting of panchayat committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.