92 हजार लांबवून शेतक:याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 00:19 IST2017-01-28T00:19:58+5:302017-01-28T00:19:58+5:30
बँकेतून बोलत असल्याची बतावणी करीत एटीएम कार्डाविषयी माहिती घेत जैताणे ता़ साक्री येथील एका शेतक:याची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आह़े

92 हजार लांबवून शेतक:याची फसवणूक
जैताणे : बँकेतून बोलत असल्याची बतावणी करीत एटीएम कार्डाविषयी माहिती घेत जैताणे ता़ साक्री येथील एका शेतक:याची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आह़े त्यांच्या खात्यातून 92 हजार 979 रुपये परस्पर काढण्यात आले आहेत़
साक्री तालुक्यातील जैताणे येथील शेतकरी अनिल देवबा सूर्यवंशी यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जैताणे शाखेत खाते आह़े त्यांना एका मोबाइलवरून कॉल आला़ बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगत आधार लिंक करण्यासाठी आधार नंबरची मागणी त्याने केली़ त्यानंतर एटीएम कार्ड जे नवीनच आहे ते चालू करण्यासाठी कार्डावरील शेवटच्या दोन डिजिटची विचारणा केली असता सूर्यवंशी यांनी माहिती देऊन टाकली़ त्यानंतर त्यांच्या खात्यातून 92 हजार परस्पर काढण्यात आल़े त्यांनी दिलेली तक्रार सायबर क्राईम शाखेकडे चौकशीसाठी पाठविली आह़े