आॅनलाइन लोकमतशिरपूर : तालुक्यातील खर्दे बु़ येथे आईच्या घरातून मुलीनेच ९२ हजार चोरल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस स्टेशनला मुलीविरोध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील खर्दे येथील चमेलीबाई रामदास इंगळे (वय ५५) या महिलेने ९२ हजार रूपयांची रोकड घरातील कपाटात ठेवली होती़ ती महिला काही कामानिमित्त बाहेर गेली असतांना तिची २५ वर्षीय मुलीने घरातील कपाटातून सदरची रक्कम चोरून नेली़ चमेलीबाई घरी आल्यावर त्यांना कपाटातील रक्कम दिसून आली नाही़ त्यामुळे त्यांनी लागलीच मुलगी जया हिस मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर मोबाईल बंद ठेवून ती पसार झाली होती़ त्यामुळे महिलेने मुलीच्या विरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुलीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील खर्दे येथे आईच्या घरातून मुलीने चोरले ९२ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:53 IST