कोरोना बाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST2021-04-03T04:32:00+5:302021-04-03T04:32:00+5:30

धुळे खासगी रुग्णालयांनी शासनाच्या निर्देशानुसार ८० टक्के बेड कोरोना बाधितांसाठी आरक्षित ठेवावे. तसेच रोज उपलब्ध बेडची माहिती महापालिकेला कळवावी, ...

80% of private hospital beds are reserved for corona patients | कोरोना बाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड राखीव

कोरोना बाधित रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांचे ८० टक्के बेड राखीव

धुळे खासगी रुग्णालयांनी शासनाच्या निर्देशानुसार ८० टक्के बेड कोरोना बाधितांसाठी आरक्षित ठेवावे. तसेच रोज उपलब्ध बेडची माहिती महापालिकेला कळवावी, अशी सूचना महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी खासगी रुग्णालयांचे प्रमुख अधिकारी व व्यवस्थापकांना केली.

महापालिकेत आयुक्त अजिज शेख यांच्या दालनात गुरुवारी बैठक झाली. यावेळी आयुक्त अजिज शेख म्हणाले की, शासन निर्देशानुसार खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात दर पत्रक लावावे. तसेच ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित ठेवावे. रुग्णालयात निर्माण होणाऱ्या जैविक घनकचऱ्याची विल्हेवाट शासकीय मार्गदर्शक तत्त्वानुसार लावावी. रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूची माहिती तातडीने द्यावी. मृतदेह शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नातेवाइकांकडे द्यावा. नॅशनल पोल्युशन कंट्रोल बोर्डात प्रत्येक रुग्णालयाने नोंदणी करावी. नागरिक, रुग्णांची गैरसोय व अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. बिलाबाबत तक्रारी असल्यास मनपा भरारी पथकास सहकार्य करावे, असेही आयुक्त म्हणाले. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, सहायक आयुक्त विनायक कोते, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: 80% of private hospital beds are reserved for corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.