नाणे येथील ८० शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:14 IST2020-07-06T21:13:40+5:302020-07-06T21:14:12+5:30
प्रधानमंत्री किसान योजना : खात्यात पैसे जमा झालेच नाहीत

dhule
धुळे : तालुक्यातील नाणे येथील ८० शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभापासून अजुनही वंचित आहेत़ त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत अशी तक्रार या शेतकऱ्यांची आहे़
दरम्यान, पंचायत समितीचे सभापती विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली़ जिल्हाधिकाºयांशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले़ यावेळी गावाचे सरपंच अजय राजपूत, भाजप सरचिटणीस छोटू मासुळे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र राजपूत आदी उपस्थित होते़
निवेदनात म्हटले आहे की, सोपान रामसिंग जाधव, गोकूळ गोजरसिंग राजपूत, आनंद काळू राजपूत, रुपसिंग रामसिंग जाधव, नथ्थु रायसिंग राजपूत, एकनाथ विजयसिंग राजपूत, रवींद्र मानसिंग राजपूत यांच्यासह ८० शेतकºयांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे त्वरीत जमा करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे़