दगडफेकप्रकरणी आठ अटकेत
By Admin | Updated: January 23, 2017 00:54 IST2017-01-23T00:54:41+5:302017-01-23T00:54:41+5:30
देवपूर भिलाटीतील घटना : महिलेला दुचाकीचा धक्का लागल्याने वाद

दगडफेकप्रकरणी आठ अटकेत
धुळे : शहरातील देवपुरातील भिलाटी परिसरात महिलेला दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून शनिवारी रात्री दोन गटात वाद झाला़ दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली़ दगडफेकीत दोन जण जखमी झाल़े याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात रविवार 28 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक केली आह़े
देवपुरातील सुशीनाला किनारी असलेल्या भिलाटी परिसरातील मरीमाता मंदिराजवळ 21 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सार्वजनिक विहिरीवर कपडे धुत असतांना रत्नाबाई भारत फुलपगारे या महिलेला दुचाकीचा धक्का लागला़ यावरून वाद झाला़ परिसरातील नागरिकांनी हा वाद मिटवला़ मात्र त्याचे पडसाद रात्री 8 वाजेच्या सुमारास उमटल़े दोन गट समोरा-समोर आल़े त्यांनी एकमेकांवर दगड व विटा फेकून मारल्या, त्यामुळे तणावात आणखी भर पडली़
पोलीस अधिका:यांची भेट
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी यांच्यासह आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाल़े त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली़
याप्रकरणी पोलिसांनी रात्री तीन वाजता आठ संशयितांना अटक केली़ त्यांना रविवारी दुपारी न्यालयात हजार केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आह़े या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी़पी़ ढोके करीत आहेत़
पोलीस बंदोबस्त
घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. ती कायम रहावी यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तो रविवारीही कायम होता.
गुन्हा दाखल आणि अटक
याप्रकरणी पो़ना अशोक सूर्यवंशी यांनी देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जमील शेख, शकील शेख यासीन (35), असलम मोहम्मद पठाण (40), अन्वर बेग रसुल बेग (23), भारत पंडीत फुलपगारे (23), दादा सुकलाल मालचे (27), धर्मा विनायक काळे (37), जुगनू भाऊराव मोरे (40) सर्व रा़मरीमाता भिलाटी देवपूर, धुळे व इतर 15 ते 20 जणांविरुध्द भादंवि कलम 143, 147, 323, 335, 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांकडून अटकसत्र सुरूच आहे.