संत चोखामेळा यांची ७५३ वी जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:09+5:302021-01-15T04:30:09+5:30
कार्यक्रमात राष्ट्रीय कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड व संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांनी संत चोखामेळा ...

संत चोखामेळा यांची ७५३ वी जयंती उत्साहात साजरी
कार्यक्रमात राष्ट्रीय कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड व संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रा. वैशाली पाटील यांनी संत चोखामेळा यांचा अभिनय सादर केला. यात दीपाली पाटील या विठ्ठलाच्या, अर्चना पाटील रुक्मिणीच्या, यामिनी खैरनार या संत चोखामेळाच्या बहीण निर्मळाच्या, शारदा पाटील या संत चोखामेळा यांच्या पत्नी सोयराच्या, आशा पाटील संत चोखामेळा यांच्या आजीच्या भूमिकेत अशा विविध भूमिका सादर करून अभंग व प्रबोधन करून जयंती साजरी केली.
यात प्रा. वैशाली पाटील म्हणाल्या, महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतांनी आपल्या वाणीने महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक आणि सांंस्कृतिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणले. संत म्हणजे समाजसेवा, संत म्हणजे समानता आणि संत म्हणजे त्याग आणि समर्पण. चांगुलपणाचे व नैतिकतेचे जनक संतच असे मानणारा वारकरीवर्ग आहे. याच वारकरीवर्गातील संत नामदेवांना संत कवी चोखामेळा आपले गुरू मानायचे.
संत चोखामेळा हे मराठी भाषेतील पहिले दलित समाजातील कवी आहेत. पंढरपूरजवळ असलेले मंगळवेढा या गावचे रहिवासी होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे ते थोर भक्त होते, तरीही त्यांची जात त्यांच्या मंदिर प्रवेशाच्या आड येत होती.
संतांच्या लेखणातील विषयच संत चोखामेळांच्या अभंगवाणीतून वेळोवेळी बाहेर पडले आहेत आणि भागवत संप्रदायाशी संत चोखामेळा एकरूप झाले आहेत.
विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी...हे दृश्य पाहून चोखामेळा हरखून गेले आहेत.
संत चोखामेळांंचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून संत नामदेवांनी आणि इतर भाविकांनी संत चोखामेळा यांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली, असे चरित्रकार सांगतात.
यावेळी सोनम पाटील, माधवी जाधव, योगिता पाटील, मंगल गवळी, संगीता बाविस्कर, जया लोखंडे, मालती राठोड, सखुबाई खरात, लीलाबाई पाटील इ. भरतनगर, आधारनगर,
रामदासनगर ,अरुणकुमारनगर येथील महिला उपस्थित होत्या.