७४ विद्यार्थी उमवि गुणवत्ता यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 15:05 IST2020-08-05T15:05:17+5:302020-08-05T15:05:25+5:30
शिरपूर : आर.सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील बी.सी.ए.चे यश

७४ विद्यार्थी उमवि गुणवत्ता यादीत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील आर.सी. पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील बी.सी.ए.च्या विद्यार्थ्यांनी मे २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय परिक्षेत घवघवीत यश मिळवत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. या महाविद्यालयातील ७४ विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.
बी.सी.ए. प्रथम वर्षामधून परिसंस्थेतील ४० विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम दहा क्रमांकात विशेष प्राविण्य मिळविले. माधुरी राजेंद्र ठाकरे हिने ९२.२१ टक्के मिळवून विद्यापीठात प्रथम, रत्ना संजय माळी हिने ९१.५७ विद्यापीठात द्वितीय तर शुभम राजेंद्र कुलकर्णी ९२ टक्के मिळवून विद्यापीठात तृतीय स्थान मिळविले.
बी.सी.ए. द्वितीय वर्षामधून परिसंस्थेतील ३४ विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम दहा क्रमांकात विशेष प्राविण्य मिळविले. त्यात तेजस्विनी प्रल्हाद राजपूत हिने ९३.२९ टक्के गुण मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय स्थान मिळविले. अंजू अशोकन अशोकाभवन हिने ९१.२९ टक्के मिळवून विद्यापीठात द्वितीय स्थान मिळविले, प्रगती जयवंतराव साळुंखे हिने ८७.९३ टक्के मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय स्थान मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, चेअरमन राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील, परिसंस्थेच्या संचालिका डॉ.वैशाली पाटील, एम.सी.ए. विभाग प्रमुख प्रा.मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभाग प्रमुख डॉ.मनोज पटेल, पदवी विभाग प्रमुख प्रा.तुषार पटेल यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रा.दिनेश बोरसे, प्रा.सचिन सुराणा, प्रा.अमर गौर, प्रा.केदार आपटे, प्रा.महेश भावसार, प्रा.मानसी वैद्य, प्रा.योगेश सेठिया, प्रा.प्रियंका भंडारी, प्रा.अमुल तांबोळी, प्रा.लक्ष्मीकांत शर्मा, प्रा.बागवान सुफियान, प्रा.प्रियंका सैंदाणे, रजिस्ट्रार वैशाली गोरले, डी.यु.चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.