‘जीएसटी’पोटी धुळे मनपाला 7.34 कोटीचे अनुदान
By Admin | Updated: July 5, 2017 11:41 IST2017-07-05T11:41:28+5:302017-07-05T11:41:28+5:30
शासनाने जीएसटी अनुदानाचा पहिला हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर केला आह़े

‘जीएसटी’पोटी धुळे मनपाला 7.34 कोटीचे अनुदान
ऑनलाईन लोकमत
धुळे ,दि.5 - शासनाने जीएसटी अनुदानाचा पहिला हप्ता स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर केला आह़े धुळे मनपाला एलबीटी अनुदानापेक्षा 80 लाख रुपये वाढीसह 7 कोटी 34 लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आह़े
देशभरात 1 जुलैपासून जीएसटी ही नवीन करप्रणाली लागू झाली असून या करप्रणालीच्या मोबदल्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना पाच वर्षार्पयत अनुदान दिले जाणार आह़े त्यानुसार राज्य शासनाने अनुदानाचा पहिला हप्ता वितरित केला आह़े मनपाला एलबीटीपोटी 6 कोटी 54 लाख रुपयांचे अनुदान मिळत होत़े मनपाने जीएसटीच्या मोबदल्यात 9 कोटी 20 लाख रुपये अनुदान दरमहा मिळावे, अशी मागणी केली होती़ मात्र शासनाने 7 कोटी 34 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आह़े तरीही 80 लाख रुपयांची वाढ मनपाच्या अनुदानात झाल्यामुळे काही प्रमाणात का होईना, मनपाला दिलासा मिळाला आह़े