600 crore development work started in the metropolis | ६०० कोटीतून महानगरात विकास कामे सुरू

dhule

धुळे : शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जरी पाणी पुरवठा करता आलेला नाही. तरी शहरातील प्रत्येक भागात पाणीपुरवठा होण्यासाठी १३६ कोटीची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे. नवीन वर्षात काम पुर्णत्वास आल्यानंतर नक्की दिवसाआड का होईना पाणी मिळले असा विश्वास महापौर चंद्रकांत सोनार यांनी व्यक्त केला आहे.
भाजपाकडून बहूसंख्य आश्वासन पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मुख्य पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा धरणातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच तापी योजनेतून शहरातील जलकुंभ करण्याचे नियोजन केलेले आहे. तांत्रिक अडचणी, पाणी पुरवठ्याचे नियोजनासाठी विजेची समस्या सोडविण्यासाठी टाटा कन्सलटींग कंपनीला ठेका दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिपत्याखाली सुरळीत पाणीपुरवठा होईल.
उद्यानाचा विकास
पांझरा नदी किनारी मनपाकडून पाच कोटी रूपयातून उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच ७० लाखांच्या निधीतून महाराणा प्रताप पुतळा परिसर सुशोभिकरण, जुन्या मनपाजवळ खाऊ गल्लीचे काम सुरु आहेत. तर निधी अभावी बंद पडलेले टॉवर बगीचा सुशोभिकरणाचे काम आता महापालिका फंडातून करण्यात येणार आहे.
उद्योग व विकास कामांना चालना-
शहरातील बेरोजगार तरूणांना रोजगार व मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मनपा शाळा क्रंं. ५, १७, नवरंग जलकुंभ, देवपूर सव्हे् क्रं.७३ तसेच शाळा क्रं. २८ तसेच गुजराथी शाळा अशा विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.
ड्रेनेज लाईनकाम सुरू-
शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी भुमिगत गटारी कामे केली जात आहे. सध्या देवपूर भागात ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर टप्या-टप्यात केली जातील. हद्दवाढीतही कामे होण्यासाठी सव्हेक्षण केले जात आहे. त्याठिकाणी येणाऱ्या काळात कामे मार्गी लागतील.
संपुर्ण शहरात एल. ए. डी-
नव्याने समाविष्ठ व नवीन कॉलनी भागात पथदिवे नसल्याने नागरिकांनी गैरसोय होते. जुन्या पथदिव्यांमुळे मनपाला मोठ्या प्रमाणात वीज बिल भरावे लागते. वीजेचा खर्च व नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी शहरात एलएडी पथदिवे बसविण्यात येणार आहे.
संरक्षण भिंतीचे काम सुरू-
समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी गजानन कॉलनी भागात संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. सध्या ते काम प्रगतीपथावर आहे. तसेच मनपा कर्जमुक्त होण्यासाठी मालमत्ता धारकांनी नव्याने मॅपींग केली जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले.

Web Title: 600 crore development work started in the metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.