धुळे : जिल्ह्यातील आणखी ६ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले. एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ९२४ इतकी झाली आहे. बुधवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ६२ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. विद्यानगर धुळे १, स्वामीकुंज वसतिगृह धुळे १, कृषी कॉलनी धुळे १ व गल्ली क्रमांक चार येथील एकाचा समावेश आहे.उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १६ अहवाल निगेटिव्ह आले, तसेच रॅपिड अँटिजन टेस्टच्या ४ अहवाल निगेटिव्ह आले. भाडणे येथील ३८ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात कोल्हार वाद कासारे १ व नांद्रे येथील एका रुग्णाचा समावेश आहे, तसेच रॅपिड अँटिजन टेस्टच्या ५ अहवाल निगेटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील सर्व ८ अहवाल निगेटिव्ह आले. एसीपीएम प्रयोगशाळेतील ५ अहवाल निगेटिव्ह आले.
६ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:22 IST