उद्यापासून ५३३ शाळा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:47 IST2021-02-05T08:47:22+5:302021-02-05T08:47:22+5:30
दरम्यान, शासनाने आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा सुरू ...

उद्यापासून ५३३ शाळा सुरू होणार
दरम्यान, शासनाने आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली. या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणीही करण्यात आलेली आहे.
धुळे जिल्ह्यात शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यच्या पाचवी ते आठवीच्या ६८४ शाळा असून, बुधवारपासून यापैकी ५३३ शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात पाचवीचे ३५०, सहावीचे २८०, सातवीचे ३१०, तर आठवीचे २१३ वर्ग आहेत. पाचवी ते आठवीपर्यंतची विद्यार्थी संख्या एक लाख ६३ हजार ३५४ एवढी आहे, तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या १२ हजार ९०६ एवढी आहे.
ज्या प्रमाणे नववी ते १२वीपर्यंतच्या वर्गात ५० टक्के विद्यार्थी उपस्थिती होती, त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
दरम्यान, शाळा सुरू करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., प्राथमिक शिक्षणाधिकारी, चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.