रेखाकला स्पर्धेत १३१ विद्यार्थी चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:13 IST2020-02-10T23:13:13+5:302020-02-10T23:13:41+5:30
पिंपळादेवी शाळा : १४३ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, हर्षदाला मिळाली ‘अ’ श्रेणी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मोहाडी उपनगर येथील पिंपळादेवी शाळेच्या १३१ विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत यश मिळविले आहे़
सन २०१९ -२०२० या वर्षात घेण्यात आलेल्या एलिमेंटरी परीक्षेत १०७ तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३६ असे एकूण १४३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ त्यापैकी १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ एलिमेंटरी परीक्षेत हर्षदा विशाल आव्हाळेला अ श्रेणी मिळाली तर प्रियंका एकनाथ पाटील, गितांजली दिपक खैरनार, तनुश्री योगेश पाटील, नेहा प्रदिप पाटील यांनी ब श्रेणी प्राप्त केली़ या परीक्षेत शाळेचा ९७ टक्के निकाल लागला आहे़
तसेच इंटरमिजिएट परीक्षेत भाग्यश्री हेमंत पाटील, मनोज दगडू बोरसे, घृणेश महादेवप्रसाद सूर्यवंशी यांनी ब श्रेणी प्राप्त केली आहे़ या परीक्षेत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे़ यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक बी़ जी़ पाटील, योगेश वाघ यांचे मार्गदर्शन लाभले़ संस्थेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांच्यासह संचालक मंडळ, मुख्याध्यापक आऱ व्ही़ पाटील, उप मुख्याध्यापक एस़ डी़ बाविस्कर, पर्यवेक्षक के़ आऱ सावंत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे़