४५ अहवालांची प्रतिक्षा तर ८८६ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 20:15 IST2020-05-05T20:11:46+5:302020-05-05T20:15:45+5:30

सहा रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

45 reports awaited while 886 patient reports negative | ४५ अहवालांची प्रतिक्षा तर ८८६ रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह

Dhule

धुळे- मंगळवारी ४५ रूग्णांचे स्वॕब घेण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबीत आहेत अशी माहिती हिरे रूग्णालयाचे समन्वयक डॉ. दिपक शेजवळ यांनी दिली. जिल्ह्यातील चार रूग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. तीन महिलांसह एका युवकाने कोरोनावर मात केली आहे. त्यांचे रिपोर्ट याआधी पॉजीटीव्ह आले होते. मागील १४ दिवसांपासून त्यांच्यावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. १४ दिवसानंतर त्यांची स्वॕब घेऊन पुन्हा तपासणी केली असता चार रूग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. टाळ्यांच्या गजरात रूग्णांना रूग्णालयातुन निरोप देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील ८८६ रूग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच ३२ रूग्ण पॉजीटीव्ह आढळले आहेत. तसेच सहा रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: 45 reports awaited while 886 patient reports negative

टॅग्स :Dhuleधुळे