देवपूरात ४४ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:34 IST2020-05-18T21:33:56+5:302020-05-18T21:34:31+5:30

गुन्हा दाखल : गणपती मुर्तीसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश

44,000 burglary in Devpur | देवपूरात ४४ हजारांची घरफोडी

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूरातील पांडव नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून ४४ हजार रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीला आली़
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवपूरातील पांडव नगरात पाटील वाड्यामध्ये १४ मे ते १८ मे च्या दरम्यान रवींद्र वसंतराव शिंदे यांच्या घरात ही चोरी झाली़ रवींद्र शिंदे हे कुटूंबियांसमवेत बाहेरगावी गेले होते़ सोमवारी सकाळी ते घरी परतले़ त्यावेळी घराच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला़ त्यानंतर लाकडी कपाट फोडून त्यातील गणपतीची चांदीची मुर्ती, सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण ४४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़
रवींद्र शिंदे यांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली़ माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी पंचनामा केला़
याप्रकरणी रवींद्र शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देवपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लॉकडाउनमुळे शहर आणि परिसरातील अनेक जण अजुनही बाहेरगावी अडकले आहेत़ कॉलनी परिसरात अनेक घरे बंद आहेत़ रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांचा वावर वाढला आहे़ त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी कॉलनी परिसरातील नागरिकांनी केली आहे़

Web Title: 44,000 burglary in Devpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे