४२ हजार दिव्यांगांची प्रशासनाकडे नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 11:51 IST2020-12-03T11:51:02+5:302020-12-03T11:51:16+5:30
धुळे : सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या ...

dhule
धुळे : सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र केवळ ३ ते ४ योजना त्यांच्यापर्यंत पोहचू शकल्या आहेत. जिल्ह्यात ४२ हजार दिव्यांगाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे असतांनाही अनेक दिव्यांग शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगावर होणारा अन्य दूर करून योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे गरचे आहे, असे मत प्रहार क्रांती संघटनेचे शहराध्यक्षा ॲड कविता पवार यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना सांगितले.
आज काळा दिवस साजरा
जागतिक दिव्यांग दिवस साजरा होतो. दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक योजना मंजूर केल्या आहे. योजना राबवण्याचे आदेशही दिले आहे; परंतु सर्व योजना कागदावर असल्याची स्थिती आहे. दिव्यांगांच्या योजनांची शासकीय कर्मचारी अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे दिव्यांगांना या योजनांचा लाभ मिळत नाही.
प्रशासनाला जागे करण्यासाठी आज काळा दिवस साजरा केला जाणार आहे. दिव्यांगांनी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषदेजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन ॲड. अप्पासाहेब बोरसे यांनी केले आहे.
दिव्यांगाना मदतीचा हात
अपंग पुनर्विकास संस्थेच्यावतीने अपंग दिनाचे औचित्य साधून जुने जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी गरूडबाग येथे अपंग पुरविकास संस्थेच्यावतीने अंपगाचा सत्कार, १०० गरजू दिव्यांंगाना ब्लॅकेट व कपडे वाटप, युनिक कार्ड शिबीर तसेच गरजू अपंग विधवा महिलांना शिक्षण कला केंद्र सुरू केले जाणार आहे. तरी अंपग बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.