4 killed in different accidents in Dhule district | धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ४ जण ठार

धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ४ जण ठार

धुळे : जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ४ जण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ठिकठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.
ट्रालाच्या धडकेत आजोबा ठार, नातू जखमी
चांदवड तालुक्यातील दलगाव येथील राजाराम तानाजी नरोटो (७९) व सचिन आनंद हालनोर (वय २१) हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच १५- ईडब्ल्यु ५३०९) धुळ्याकडून पारोळ्याकडे जात होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणा?्या ट्रालाने (क्र. जीजे ११-टीटी ८०९९) दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत राजाराम नरोटे हे जागीच ठार झाले. तर सचिन हालनोर हा जखमी झाला. हा अपघात २७ फेबु्वारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कासविहीर शिवारात झाला. याप्रकरणी शांताराम नरोटे यांनी दिलेल्या फियार्दीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये ट्राला चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दुचाकी घसरल्याने एकजण ठार एकजण जखमी
धुळ्यातील मोहाडी उपनगरातील संतोष एकनाथ चौधरी (वय ४०, रा. मोहाडी उपनगर) व किशोर बबन चौधरी (रा. पाटण, ता.चाळीसगाव) हे दुचाकीने (क्र.एमएच १९-डीआर ७२३७) जात असतांना फागणे गावाच्या अलीकडे दुचाकी घसरली. त्यात संतोष चौधरी खाली पडले. त्यांना मार लागल्याने, त्यांचा मृत्यू झाला. तर किशोर चौधरी जखमी झाले. हा अपघात २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी प्रमोद चौधरी यांनी दिलेल्या फियार्दीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनला किशोर चौधरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.एस. काळे करीत आहेत.
रिक्षा-दुचाकी अपघातात एकजण ठार
शिंदखेडा तालुक्यातील रोहोड फाट्याजवळ रिक्षा-दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी झाली. त्या अपघाताची नोंद २७ रोजी शिंदखेडा पोलीस स्टेशनला करण्यात आली. महेश छोटालाल शर्मा (रा. इटावा, मध्यप्रदेश, ह.मु.चिमठाणे, ता. शिंदखेडा) हे दुचाकीने फर्निचरचे लाकूड पाहण्यासाठी जात असतांना रोहोड फाट्याजवळ समोरून येणा?्या मालवाहू रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेश शर्मा हे ठार झाले. याप्रकरणी रामप्रकाश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस स्टेशनला मालवाहू रिक्षा चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल आर.एम. माळी करीत आहेत.
दोन दुचाकींच्या धडकेत एकजण ठार
दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धहकेत एकजण ठार व एकजण जखमी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील शिवाजीनगर फाट्याजवळ २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. भरत विष्णू पाटील (४०, रा. मोरशेवडी, ता. धुळे, ह.मु. खापर, ता. अक्कलकुवा) हे दुचाकीने (क्र. एमएच ३९-एए ९४४१) जात असतांना शिवाजीनगरच्या पुढे मागून येणा?्या दुचाकीने (एमएच १८-ए ९२५७) जोरदार धडक दिली. यात भरत पाटील व जीजाबाई पाटील हे खाली पडले. त्यात भरत पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रभाकर देवरे (रा. बोरीस) यांनी दिलेल्या फियार्दीवरून निजामपूर पोलीस स्टेशलना दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 4 killed in different accidents in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.