ताडी दुकानदाराकडून ३५ हजाराची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 21:59 IST2020-12-02T21:59:22+5:302020-12-02T21:59:45+5:30
शिरपूर येथील घटना, संशयिताला पकडले

ताडी दुकानदाराकडून ३५ हजाराची खंडणी
शिरपूर : येथील ताडी विक्री दुकानदाराकडून ३५ हजार रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिरपूर पोलिसात एकाविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
शहरातील मच्छीबाजारात यादगिरीवार ब्रदर्स या नावाने परवानाधारक ताडी विक्री केंद्र आहे़ तेथील दुकानाची युट्युब चॅनेलवर बदमानीकारक वृत्त प्रसारीत करण्याची धमकी देत दुकानदाराकडून ३५ हजार रूपयांची मागणी केली़ मात्र ताडी विक्री केंद्राचे व्यवस्थापक श्रीकांत श्रीहरी यादगिरी रा़वकील कॉलनी शिरपूर यांनी घाबरून १३ हजार रूपये देवू केले़ मात्र संशयित आरोपी आनंद उर्फ वावड्या दत्तात्रय पाटील राख़ालचे गांव शिरपूर याने सदरची रक्कम न स्वीकारता मारण्याची धमकी दिली़
याबाबत ताडी विक्री केंद्राचे व्यवस्थापक श्रीकांत यादगिरी यांनी दिलेल्या फिर्यादवरून शिरपूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सदर आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे़