धुळे : भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी द्यावे, अशी आपली संस्कृति सांगते़ त्यामुळेच सर्वत्र अन्नछत्र आणि पाणपोई सुरु असतात़ धुळे शहरातील अग्रवाल कुटुंब नेहमी अग्रेसर राहिलेले आहे़ सध्या देशात लॉकडाउन असल्याने अनेक गरीब व गरजू लोकांना किमान दोन वेळेचे अन्न मिळणे कठीण झालेले आहे़ अशा बिकट परिस्थितीत भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेत दररोज २० हजार अन्नाची पाकिटे तयार करुन गरजूपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत़मुळात घरातूनच सामाजिक कार्याचा वसा लाभलेले अनूप अग्रवाल हे गेल्या ७ वर्षापासून धुळे महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत आहेत़ त्यांचे वडील ओमप्रकाश अग्रवाल हे देखील समाजासह धुळेकरांमध्ये दानशूर म्हूणन परिचित आहेत़ तर हा वसा ज्यांनी दिला ते पुरणमल बालुराम अग्रवाल हे देखील उद्योगपती आणि धुळ्यात नावाजलेले व्यक्ती होते़ दातृत्वाचा झिरपलेला हा वसा तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन पोहचलेला आहे़सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे़ हातावर पोट असलेल्या गरीबांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्याजवळ असलेली पुंजी संपली़ उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला होता़ डोक्यावर छप्पर हा आधार असलातरी किमान दोन वेळेस अन्नाची सुध्दा गरज असते़ सर्वत्र बंद असल्याने मिळणे मुश्किल होते़ अशा कठीण प्रसंगी अनुप अग्रवाल हे पुढे आले़ त्यांनी गरीबांना जेवण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला़ त्यांच्या कार्याची दखल अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांना हातभार लावला़सामाजिक बांधीलकी म्हणून मी हा उपक्रम सुरु केला आहे़ गरजू लोकांपर्यंत अन्न पोहचविण्याचा माझा प्रयत्न आहे़ उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे़- अनूप अग्रवाल
‘गरजू’ लोकांसाठी रोज २० हजार ‘डबे’़़़!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:50 IST