जिल्ह्यात ३० रुग्ण झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:15 IST2020-06-13T22:14:24+5:302020-06-13T22:15:16+5:30
टाळ्याच्या गजरात दिला निरोप : धुळे शहरातील सर्वाधिक १७ रूग्णांचा समावेश

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शुक्रवारी जिल्ह्यातील आणखी ३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धुळे शहरातील १७ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, जिल्हा रुग्णालयातून पाच, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून चार तसेच दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातून दोन रुग्णांना निरोप देण्यात आला.
धुळे शहरातील मोहम्मदीया नगर येथील तीन रुग्णांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. माणिक नगर येथील एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन कर्मचारी, नूरानी मज्जीद , वडेल रोड परिसर, जयहिंद कॉलनी, मौर्या हौसिंग सोसायटी व ग्रीन कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनमुक्त झाला आहे.
निरोप देतांना आमदार डॉ.फारुख शाह, अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी, डॉ. दीपक शेजवळ, डॉ.निर्मलकुमार रवंदळे यांच्या आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
शिरपूर - येथील रोजी उपजिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी चार रूग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून व फळांची परडी देऊन, आरोग्य सुदृढ राहण्याच्या शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डी. एन .वाघ ,नायब तहसीलदार अडारी, डॉ. कपिल पाटील, डॉ. योगेश अहिरे, डॉ. मोज्जम खान, डॉ. अमोल जैन, डॉ. महेंद्र साळुंखे, गावित, चित्ते, माळी, नांदगावकर, के.झेड.पगार , विनोद निकम, जवरास मावशी, भगवान बोरसे, विलास धाकड, प्रवीण पाटील, निलेश गवळी, गणेश बेंडवाल, अशोक बिरारी उपस्थित होते. शिरपुर उपजिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत एकूण ३० रुग्ण कोरोना मुक्त झालेत.
दोंडाईचा - मुंबई कनेक्शन असलेल्या एक महिला व एक पुरुषाला कोरोनाची लागण झालेल्या दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना टाळ्यांचा गजरात फुले उधळत निरोप देण्यात आला.
यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसीलदार सुदाम महाजन, जिल्हा नोडल अधिकारी विशाल पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अनिल नरोटे, डॉ. सचिन पारख, डॉ. प्रफुल दुग्गड, डॉ.भूषण मोरे, तालुका कोरोना सेंटरचे डॉ. हितेंद्र देशमुख, दोंडाईचा नगरपालिका आरोग्य विभागाचे जितेंद्र गिरासे, पालिका आरोग्य विभागाचे शरद महाजन, तालुका नोडल अधिकारी डॉ.भामरे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. संतोष लोले आदी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांनी रुग्णालयात सर्व सुविधा मिळल्याबद्दल समाधान व्यक्त केले.