एचआयव्ही पॉझिटिव्ह ३० महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:14+5:302021-01-16T04:40:14+5:30
गेल्या २०२० या वर्षभरात धुळे तालुका ३१ हजार ६५४, साक्री तालुका ११ हजार ९१९, शिंदखेडा तालुका ९ हजार ...

एचआयव्ही पॉझिटिव्ह ३० महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म
गेल्या २०२० या वर्षभरात धुळे तालुका ३१ हजार ६५४, साक्री तालुका ११ हजार ९१९, शिंदखेडा तालुका ९ हजार २५१ आणि शिरपूर तालुक्यात ११ हजार ८५७ असे एकूण ६४ हजार ६८१ रुग्णांची एड्सची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी धुळे तालुक्यातून २५ एचआयव्ही पाॅझिटिव्ह महिलांनी २५ निगेटिव्ह बाळांना सुखरूप जन्म दिला. तर साक्री तालुक्यातील दोन तर शिंदखेडा तालुक्यातील दोन एचआयव्ही पाॅझिटिव्ह मातांनी सुदृढ निगेटिव्ह बालकांना जन्म दिला. शिरपूर तालुक्यात फक्त एका एचआयव्ही मातेने एका निगेटिव्ह बालकाला जन्म दिला आहे. जिल्ह्यात तपासणी केलेल्या रुग्णांपैकी एचआयव्ही पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत खूप घट आली आहे.
१६ महिला आढळल्या बाधित
जिल्ह्यात एड्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६ महिला पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यात धुळे तालुक्यात १० तर साक्री तालुक्यात १, शिंदखेडा तालुक्यातील २ आणि शिरपूर तालुक्यातील ३ महिला बाधित आढळल्या.
गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी
गरोदर महिलांनी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयातून एचआयव्हीची टेस्ट करून घेतली पाहिजे. ती नि:शुल्क असते. ती टेस्ट केल्यानंतर येणारा रिपोर्ट हा गोपनीय ठेवला जातो. त्यामुळे मनात कुठलीही भीती न बाळगता तपासणी करावी.
एचआयव्ही पाॅझिटिव्ह असलेल्या मातेची आम्ही सुरुवातीपासूनच काळजी घेतो. त्या मातेवर आम्ही आर.टी. सेंटरवर उपचार करतो. त्या ठिकाणी मातेच्या वेळोवेळी आवश्यक चाचण्या केल्या जातात. तिच्या आहाराकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे सुदृढ व निगेटिव्ह बाळाचा जन्म होताे.
- डाॅ. शीतल पाटील, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी