जिल्ह्यात २७४ प्रजातीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:17 IST2019-11-10T23:17:22+5:302019-11-10T23:17:38+5:30
पक्षी सप्ताह : राज्यात ५४० प्रजातींची नोंद; त्याबाबत जिल्हा अव्वल

dhule
धुळे : मुंबई येथील बी़ एऩएच़एस़ संस्थेकडून सामान्य पक्षीगणना मोहीम राबविण्यात येते़ या मोहिमेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार राज्यात ५४० पक्षांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे़ त्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्यात पक्षांच्या तब्बल २७४ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे़
मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सामान्य पक्षीगणना कार्यक्रम राज्यात राबविण्यात येतो़ त्यानुसार शहरीकरणामुळे चिमण्या, कावळे, मैना, पोपट, बुलबुल अशा पक्षांचे जीवनशैली व अधिवासात बदल होतात़ त्यानुसार शहरातील ६६ प्रजातींच्या एक हजार ७११ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे़ त्यापैकी सर्वात जास्त चिमण्यांची संख्या १५.७८ टक्के, कबुतर ११.८६ टक्के, पोपट ७.८९ टक्के, बुलबुल ७.१ टक्के होती़ तर सातभाई, कावळे, मैना, चिरक, शिंजीर, बगळे, होले यांची सर्वाधिक संख्या होती़ वर्षभरात यंदा जिल्ह्यात आढळून आलेले प्रजातीमध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वोधिक म्हणजे तब्बल २७४ आहे़
पक्षी सप्ताहाद्वारे प्रबोधन
पक्ष्यांसाठी आयुष्य अर्पण करणारे दोन पक्षीतज्ञ म्हणजे डॉ़सलिम अली व मारूती चितमपल्ली यांनी पक्षी आणि निर्सग लिलित्य पुर्ण भाषेत वाचकांपर्यत पोहचविला़ या दोघांच्या जन्म दिवसानिमित्त ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षीसप्ताह करण्यात येत आहे़ सप्ताहाव्दारे नागरिकांना पक्षांची माहिती होण्यासाठी जनजागृती करण्यात आली़ नोव्हेंबर महिन्यात अनेक प्रजातींचे पक्षीस्थांतर होण्यास सुरूवात होते़ परदेशातून आलेल्या पाखरांमुळे निळेगार पाणवडे पाहण्यासाठी नकाणे तलाव येथील निसर्गरम्य वातावरणात पाखखेडे दुर्बिणीच्या सहाय्याने पक्षीमित्रांनी पाहली़
पक्षीमित्र संमेलन धोरण
व्यंकटेश माडगुळकर, मारूती चितमपल्ली, प्रकाश गोळे सारखे दिग्गज निसर्ग व पक्षिलेखन करणाऱ्या साहित्यकांनी पक्षांसाठी विशेष योगदान आहे़ याबाबत डॉ़ सलिम अलिंचे दि़ बुक आॅफ इंडियन बर्डस पुस्तकात सविस्तर माहिती मांडली आहे़ १९८१ मध्ये लोणावळा येथे पहिल्यांदा पक्षिनिरीक्षकांची मेळावा घेण्यात आला होतो़ त्यानंतर दुसºयादा १९८२ मध्ये पक्षीमित्रांनी नागपूर येथे संम्मेलनात धोरण ठरले़ त्यानुसार राज्यात नाव्हेंबर २०१७ मधील वार्षिक सम्मेलनात राज्यात पक्षि सप्ताह आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निसर्गवेध संस्थेचे अध्यक्ष डॉ़ विनोद भागवत यांनी दिली़