लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वलवाडी शिवारातील अयोध्या नगरात रविवारी पहाटे एकाच रात्री सलग ३ घरात घरफोडी झाली़ यात एका घरातून सोन्याचे दागिने लंपास झाले़ तर उर्वरीत दोन घरात चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही़ सकाळी ही बाब उजेडात आली़ घटनास्थळी पश्चिम देवपूरचे पोलीस दाखल झाले आहेत़ देवपुरातील वलवाडी शिवारात अयोध्या नगर आहे़ यात माजी सैनिक विनोद गुलाबराव वानखेडे यांचे घर आहे़ ते शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात गेले होेते़ चोरट्याने त्यांचे बंद घर फोडले़ घरातून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत़ त्यांच्या घराशेजारी संजय श्रीराम कासार आणि सोंजे नामक व्यक्तींचे सुध्दा बंद घर चोरट्याने फोडले़ मात्र या दोन घरातून चोरट्याच्या हाती काहीही मिळाले नाही़ घटना समजताच पश्चिम देवपूरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ पुढील तपास सुरु आहे़
धुळ्यातील अयोध्या नगरात एकाच रात्री ३ घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 12:45 IST
ऐवज लंपास : घटनास्थळी पोलीस दाखल
धुळ्यातील अयोध्या नगरात एकाच रात्री ३ घरफोडी
ठळक मुद्देअयोध्या नगरात एकाच रात्री घरफोडीबंद घराचा चोरट्याने घेतला फायदाचोरांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान