जिल्ह्यातील ३४२८ स्वयंपाकी, मदतनीसांना मानधनवाढीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:39 IST2019-08-05T21:39:37+5:302019-08-05T21:39:53+5:30
शालेय पोषण आहार योजना : राज्याने ५०० रूपये वाढविले

जिल्ह्यातील ३४२८ स्वयंपाकी, मदतनीसांना मानधनवाढीचा लाभ
धुळे : राज्य शासनाने शालेय पोषण आहार शिजविणाºया स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनात वाढ केली असून, त्याचा जिल्ह्यातील ३४२८ स्वयंपाकी व मदतनीसांना लाभ होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात पोषण आहारासाठी एकूण १६७६ शाळा पात्र आहे. त्यात पहिली ते पाचवीपर्यंत १ लाख ७० हजार तर सहावी ते आठवीचे एकूण ९८ हजार विद्यार्थी आहे. अशा एकूण २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला जातो. दरम्यान पोषण आहार शिजविणाºया स्वयंपाकी व मदतनीसांना शासनातर्फे मानधन देण्यात येते. पूर्वी केंद्रातर्फे ६०० रूपये व राज्यातर्फे ४०० असे एकूण १ एजार रूपये मानधन देण्यात येत होते. मात्र हे मानधन वाढवून मिळावे अशी स्वयंपाकी व मदतनीसांची मागणी होती. राज्यशासनाने स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनात ५०० रूपयांनी वाढ केली आहे. आता राज्यातर्फे ९०० व केंद्रातर्फे ६०० असे एकूण १५०० रूपयांचे मानधन देण्यात येते. जिल्ह्यातील स्वयंपाकी व मदतनीसांना याचा लाभ मिळू लागला आहे.